MAHARASHTRA

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र



पुणे,-(दत्तात्रय भोसले) प्रादेशिक परिवर्तन कार्यालय, पुणे कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर तसेच इतर हलक्या व जड वाहनांनी यांत्रिक तपासणी करुन घेणे आवश्यक असून १९ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आरटीओ आळंदी रस्ता चाचणी मैदान (फुलेनगर) येथे व दिवे (ता. पुरंदर) चाचणी मैदान येथे स्वतंत्रपणे वाहन तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मिरवणुकीदरम्यान सर्व संबंधितांनी वाहनाची सर्व कागदपत्रे व चालकाचे परवाने मुदतीत असल्याची खात्री करावी. चालकाने आपले वाहन चालविण्यासाठी दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये. वाहन एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणार असेल हॅन्डब्रेकचा तसेच उटीचा वापर करावा. वाहनाच्या इंधनाच्या टाकीचे झाकण हे धातूचेच असावे व ते घट्ट बंद करावे. वाहनचालकाच्या कॅबिनमध्ये कोणतीही सुटी वस्तु, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. चालकास वाहन चालविण्यास अडथळा होईल अशा प्रकारे कोणाही व्यक्तीस बसू देऊ नये तसेच वस्तूदेखील ठेवू नयेत. वाहन स्थिर स्थितीत असताना इंजिन बंद ठेवावे. हॉर्नचा अनावश्यक वापर टाळावा.

सर्व संबंधितांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची यांत्रिक तपासणी करून घ्यावी व त्यांची वाहने यांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button