MAHARASHTRA

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी

Oplus_131072


महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु
मुंबई (महेश कुलकर्णी)देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील 18 मुख्यमंत्री, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह संत महंत आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळालं. महायुतीला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असं यश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला आणि आघाडीला इतकं यश मिळालेलं नव्हतं. या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. पण तरीदेखील महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button