स्वानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामीण भागातील आदर्श ग्रंथालय- महेश कुलकर्णी
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज. जि. बीड. हे ग्रामीण महाराष्ट्रातील एक आदर्श आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारे वाचकांना सेवा देणारे दर्जेदार ग्रंथालय असून केंद्र व राज्य शासनाने देखील दर्जेदार ग्रंथालयांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत पत्रकार व अध्यक्ष – आदर्श पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मा. महेश कुलकर्णी यांनी दिवाळी अंक प्रदर्शन समयी दिनांक 3 -नोव्हेंबर 2024 रोजी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र उमाप, रणजीत पाटील, रविंद्र गायकवाड, यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, माजी प्रायार्य, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक वसुदेव( बप्पा) गायकवाड हे होते.
तत्पूर्वी दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन व विमोचन सेवानिवृत्त मुखाध्यापक छगन गायकवाड, आरुण गायकवाड, ईश्वर गायकवाड, तात्याराम लवटे, परमेश्वर गायकवाड, शिवम गायकवाड, समाधान विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी वसुदेव( बप्पा ) गायकवाड हे होते.दोन्ही कार्यकमात बाळासाहेब गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड,ह.भ.प. नारायण भाऊ गायकवाड, नारायण भोग जकर, आनंद( भैय्या) गायकवाड यांचासह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आनंद ( भैय्या) गायकवाड यांनी केले