चोरंबा येथील तरुणाचा कर्नाटक मध्ये मृत्यू
चोरांबा येथील तरूणाचा कर्नाटकमध्ये मृत्यू
November 22, 2024
किल्ले धारूर : चोरंबा येथील रहिवाशी ट्रॅक्टर चालक महादेव आश्रुबा कंडूकटले यांचा कर्नाटकातील सोमेश्वर कारखाना परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे यामुळे धारूर तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण ऊसतोड मजूर ट्रॅक्टर चालक महादेव अश्रुबा कुंडूकटले वय २३ वर्ष हे ऊस तोडणीसाठी कर्नाटकातील सोमेश्वर कारखान्यावर गेले होते ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून कारखाने येथे तो खाली केला परत ऊस भरण्यासाठी जात असताना वाटतच अपघात झाला यामध्ये ट्रॅक्टर चालक महादेव कंडूकटले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. महादेव याला वडील नसल्याने त्याच्या परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण ऊसतोड मजूर जागीच मृत्यू पावल्यामुळे धारूर तालुक्यात चोरंबा या गावांमध्ये तसेच परिसरामध्ये शोककळा पसरली असून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.किल्ले धारूर : चोरंबा येथील रहिवाशी ट्रॅक्टर चालक महादेव आश्रुबा कंडूकटले यांचा कर्नाटकातील सोमेश्वर कारखाना परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे यामुळे धारूर तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण ऊसतोड मजूर ट्रॅक्टर चालक महादेव अश्रुबा कुंडूकटले वय २३ वर्ष हे ऊस तोडणीसाठी कर्नाटकातील सोमेश्वर कारखान्यावर गेले होते ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून कारखाने येथे तो खाली केला परत ऊस भरण्यासाठी जात असताना वाटतच अपघात झाला यामध्ये ट्रॅक्टर चालक महादेव कंडूकटले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. महादेव याला वडील नसल्याने त्याच्या परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण ऊसतोड मजूर जागीच मृत्यू पावल्यामुळे धारूर तालुक्यात चोरंबा या गावांमध्ये तसेच परिसरामध्ये शोककळा पसरली असून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.