माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश दादा सोळुंके यांना बहुमताने विजयी करा– नागेश भाऊ शिनगारे
किल्लेधारुर (प्रतिनिधी) जातीपाती व धर्माच्या पलीकडे जाऊन प्रकाश दादा सोळंके, धैर्यशील काका सोळंके, व जयसिंग भैय्या सोळंके यांनी विशेष प्रेम करून विकास कामाला प्राधान्य दिले यामुळे धारूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व मतदार बांधवांनी उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुन्हा प्रकाश दादांना घड्याळ या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन धारूर शहरात व ग्रामीण भागात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतून बोलताना युवा नेते नागेश भाऊ शिंनगारे यांनी केले आहे तर धारुर शहरात केलेली विकास कामे हिच प्रकाशदादा सोळंके यांची मोठी ओळख असून धारूर शहरातील व तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी प्रकाश दादा सोळंके यांना विजयी करणे काळाची गरज आहे
धारूर तालुक्यातील व माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार बांधवांनी आत्तापर्यंत प्रकाश दादा सोळंके यांना मतदान केल्यामुळे धारूर शहर व ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावता आली.
धारुर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला. २००९ ते २०१४ व २०१९ ते २०२४ या काळात शहर व तालुक्याचे आमदार म्हणून प्रकाशदादा सोळंके यानी केवळ विकास हेच धोरण अवलंबून आपली वेगळी छाप निर्माण केलेली आहे. धारुर शहर व तालुक्यात आ. सोळंके यांच्यासह धैर्यशीलकाका सोळंके व जयसिंगभैय्या सोळंके यांनी विकास कामाच्या माध्यमातून विशेष प्रेम केलेले आहे. तालुक्याचे भुमिपुत्र या नात्याने त्यांनी तालुक्यात विकास गंगा आणली. शहरातील सर्वजाती धर्माच्या समाजासाठी सभागृह, सभामंडप, स्मशानभुमी व कब्रस्तान दफनभुमीसाठी संरक्षक भिंती बांधल्या. तालुक्यातील प्रमुख कार्यालयांच्या इमारती उभारल्या. मुलींसाठी वस्तीगृह उभारले. रेंगाळलेला अरणवाडी साठवण तलाव प्रकल्प पुर्ण केला. धारुरच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. शहरात अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये आणून शादीखाना, सभागृह, सिमेंट रस्ते व नाली बांधकाम केले. शहरातील बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला. मराठवाडा शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयाची इमारत बांधली, राज्य शासनाकडून न्यायालयाची इमारत, शासकीय आयटीआय इमारत, नगर परिषद इमारत, दुय्यम निबंधक (रजिस्ट्री आफिस) इमारत, पशुवैद्यकिय दवाखान्याची इमारत, जिल्हा परिषद शाळा इमारत, ग्रामीण रुग्णालयात निवासस्थानाचे बांधकाम केले. ऐतिहासिक किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधि आणला. रेंगाळत पडलेल्या एमआयडिसीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या ज्यामुळे या एमआयडिसीत अनेक उद्योग सुरु झालीत. धारुर ते आडस राज्य रस्ता व धारुर ते आसरडोह रस्ता हॉटमिक्स काम अशी अनेक विकास कामे आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात आ. प्रकाशदादा सोळंके यांनी केली आहेत. धारुर शहराच्या इतिहासात कोणत्याही आमदाराने येवढी विकास कामे केलेली नाहीत. महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांची ओळख खऱ्या अर्थाने सामाजिक जान असणारा विकासपुरुष अशी या भुमिपुत्राच्या घड्याळ या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना युवा नेते नागेश शिनगारे यांनी केले आहे.धारुर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला. २००९ ते २०१४ व २०१९ ते २०२४ या काळात शहर व तालुक्याचे आमदार म्हणून प्रकाशदादा सोळंके यानी केवळ विकास हेच धोरण अवलंबून आपली वेगळी छाप निर्माण केलेली आहे. धारुर शहर व तालुक्यात आ. सोळंके यांच्यासह धैर्यशीलकाका सोळंके व जयसिंगभैय्या सोळंके यांनी विकास कामाच्या माध्यमातून विशेष प्रेम केलेले आहे. तालुक्याचे भुमिपुत्र या नात्याने त्यांनी तालुक्यात विकास गंगा आणली. शहरातील सर्वजाती धर्माच्या समाजासाठी सभागृह, सभामंडप, स्मशानभुमी व कब्रस्तान दफनभुमीसाठी संरक्षक भिंती बांधल्या. तालुक्यातील प्रमुख कार्यालयांच्या इमारती उभारल्या. मुलींसाठी वस्तीगृह उभारले. रेंगाळलेला अरणवाडी साठवण तलाव प्रकल्प पुर्ण केला. धारुरच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. शहरात अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये आणून शादीखाना, सभागृह, सिमेंट रस्ते व नाली बांधकाम केले. शहरातील बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला. मराठवाडा शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयाची इमारत बांधली, राज्य शासनाकडून न्यायालयाची इमारत, शासकीय आयटीआय इमारत, नगर परिषद इमारत, दुय्यम निबंधक (रजिस्ट्री आफिस) इमारत, पशुवैद्यकिय दवाखान्याची इमारत, जिल्हा परिषद शाळा इमारत, ग्रामीण रुग्णालयात निवासस्थानाचे बांधकाम केले. ऐतिहासिक किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधि आणला. रेंगाळत पडलेल्या एमआयडिसीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या ज्यामुळे या एमआयडिसीत अनेक उद्योग सुरु झालीत. धारुर ते आडस राज्य रस्ता व धारुर ते आसरडोह रस्ता हॉटमिक्स काम अशी अनेक विकास कामे आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात आ. प्रकाशदादा सोळंके यांनी केली आहेत. धारुर शहराच्या इतिहासात कोणत्याही आमदाराने येवढी विकास कामे केलेली नाहीत. महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांची ओळख खऱ्या अर्थाने सामाजिक जान असणारा विकासपुरुष अशी या भुमिपुत्राच्या घड्याळ या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना युवा नेते नागेश शिनगारे यांनी केले आहे.