आज समर्थ रामदास महाराज यांची पालखी बीड नगरीत
आज समर्थ रामदास महाराजांची पालखी बीडनगरीत
बीड दि.६ (प्रतिनिधी) – आज बीड मध्ये समर्थ रामदास महाराजांच्या पालखीचे आगमन होणार असून बीड मध्ये पालखीचा एकदिवसीय मुक्काम असणार आहे.महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कानोले महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
समर्थ रामदासांच्या पालखीची सुरुवात श्री क्षेत्र जांब समर्थ जि.जालना येथून तर समाप्ती सज्जनगड येथे होणार आहे. आज तिचा दुसरा मुक्काम असून तो समर्थ हनुमान मंदिर खंडेश्वरी येथे होणार आहे. उद्या दुपारी (दि.८) रोजी गजानन महाराज मंदिर सहयोग नगर येथे दुपारच्या जेवणाची व्यवस्था राहणार आहे. व पुढे पालखी तळे पिंपळगाव ता.पाटोदा कडे जाईल. आज रात्री ६ ते ८:३० वाजता श्री समर्थ हनुमान मंदिर खंडेश्वरी येथे प्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा. अशी माहिती कानोले महाराज यांनी दिली आहे. मागील अनेक वर्षापासून या पालखीची परंपरा अखंड चालू होती. पण मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पालखी निघाली नाही पण तब्बल तीन वर्षानंतर पालखी येणार असल्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी रथयात्रा सोहळ्यात सहभागी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.