MAHARASHTRA

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्य काळातील महाराष्ट्रात कृषी विभागातील महा घोटाळ्याची चौकशी करा – वसंतराव मुंडे यांची मागणी

‌ ‌ ‌ मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कृषी खात्यामध्ये जलयुक्त शिवार, बोगस खते बी बियाणे औषधी परवाने, अधिकारी कर्मचारी बदली , पदोन्नतीसाठी पात्र नसताना तोड पाणी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार केलाचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. माजी कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी या प्रक्रियेमध्ये जबाबदार असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शासन स्तरावर केली असून चौकशी होत नसल्यामुळे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सीबीआय, ईडी, लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार संपूर्ण पुराव्यासहित दाखल केल्याची माहिती देण्यात आली. तत्कालीन कृषिमंत्री सन 2019 ते 2022 च्या दरम्यान बदली, पदोन्नती, खते बी बियाणे औषधी निविष्ठा परवाने देणे ,राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील प्रकल्पांना मंजुरी देणे, फार्मसी प्रोड्युसर कंपनी यांना मंत्री पातळीवर देण्यात येणाऱ्या अनुदान व कृषी विद्यापीठातील बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट ई टेंडर मॅनेज करून टक्केवारी घेऊन काम देणे, तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कृषी विभागाचे अनेक योजनेत टक्केवारी घेऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला असून कृषी खात्याच्या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या बदल्या पदोन्नती देण्याच्या संदर्भात नागरी सेवा मंडळाकडून प्राप्त झालेले नावे बदलीस पात्र व पदोन्नती पात्र असलेल्या शिफारसी ला बगल देऊन कृषिमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकारात आर्थिक व्यवहार करून रिक्त पदे भरण्याचा चक्रकार पद्धतीचे शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करून एक वर्षाच्या आत बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असून वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना एक व दोन वर्गाच्या अधिकाऱ्यांचे अतिरिक्त पदभार देण्यात आलेले आहेत. संपूर्णपणे बदली व पदोन्नती मध्ये शासनाच्या कायद्याचे व निर्णयाचे आर्थिक व्यवहार करून नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी चालू असताना किरकोळ शिक्षणाची समज देऊन फाईल बंद करून २० नसत्या बदलीच्या व ५ नसत्या पदोन्नतीच्या मध्ये मंत्री महोदयांनी स्वतःच्या अधिकारांमध्ये शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करून आर्थिक व्यवहार करून पदोन्नती व बदल्या करण्यात आलेल्या असून संपूर्ण मुद्देनिहाय माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध झालेले आहे.चौकसीसाठी ईडी, सीबीआय ,लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली. संपूर्ण नसत्या वरील नोंदीला बगल मंत्री व कार्यालयातील सोनेरी टोळक्याच्या टीमने नियमाचे उल्लंघन केलेले आहे. त्यासाठी संपूर्ण २५ फायलींची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली. शासकीय बदल्याच्या नियमांमध्ये एक ते बारा कलम असून त्याच्या अंतर्गत पती-पत्नी व त्यांची मुले त्यांच्यावर अवलंबून असतील तर शासकीय अधिकाऱ्यांचे मुले,आई किंवा वडील यांचे पुढील आजार झालेले असतील तर सर्व कागदपत्रे नियमानुसार ज्या त्या जिल्ह्यात जो कर्मचारी कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट देणे बंधनकारक आहे.ह्रदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड किडणी प्रतिरोपण शस्त्रक्रिया डायलिसिस, कर्करोग, ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूवरील शस्त्रक्रिया ,कोमा, मनोविक्रेतीग्रस्त इत्यादी रोगासाठी खास तरतूद केलेले असताना बोगस कागदपत्रे जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी स्वतःच्या कुटुंबाबद्दल मनोविकृतीचे ग्रस्त खाजगी डॉक्टरचे बोगस मेडिकल प्रमाणपत्र देऊन मंत्री महोदयच्या टीम बरोबर आर्थिक व्यवहार करून बदल्या केलेल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . विभागीय कृषी सहसंचालक तसेच कृषी आयुक्त कार्यालय नागरी सेवा मंडळ व प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव आणि कृषी आयुक्त यांचे नागरी सेवा मंडळाच्या इतिवृत्ताची संपूर्णपणे नियमाचे बदल्या संदर्भात व पदोन्नती संदर्भात मंत्री कार्यालयाकडून उल्लंघन केले असून पदोन्नती व बदल्या संदर्भात नियमाचे उल्लंघन झाल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने कठोर कारवाई केली जाईल अशी कायद्यात तरतूद असताना माजी कृषिमंत्री यांनी व त्यांच्या कार्यालयातील सोनेरी टोळक्याच्या टीमने नियमाला बगल देऊन आर्थिक व्यवहार करून बदल्या व पदोन्नती केलेल्या आहेत, ४२ कोटीपेक्षा जास्त आर्थिक गैरव्यवहार केला असून मराठवाडा व विदर्भात नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केलेल्या नाहीत ८ ही विभागीय कृषी संचालकांना वेगवेगळ्या स्तरावर जबाबदारी देऊन आर्थिक लूट केलेली असून माजी मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयातील पी एस, ओ एस डी ,पी ए या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मोबाईल सी डी आर,रिपोर्ट ज्यांच्या बदल्या अथवा पदोन्नती झालेल्या आहेत त्यांचे मोबाईलचे सीडी रिपोर्ट घेतल्यास सर्व बाबी बदल्या व पदोन्नती संदर्भात सिद्ध होतील. मंत्र्यांनी संपूर्ण नियमाचे उल्लंघन केलेले आहे. तसेच सर्व माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त झालेल्या २५ फाईल मध्ये कृषिमंत्री यांनी विना तारखेचे आदेश व नियमबाह्यय बदल्या व पदोन्नती संदर्भात उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . तत्कालीन माजी मंत्री गृह खात्याचे श्री अनिल देशमुख यांच्यावर ईडी, सीबीआयने कारवाई केली त्याच धर्तीवर माजी कृषिमंत्री दादा भुसे वर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसनेते वसंत मुंडे यांनी केली असून जर सीबीआय ईडी लोक आयुक्ता कडून मंत्री महोदयावर तात्काळ कारवाई नाही केली तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल कारण खते बी बियाने कीटकनाशकेऔषधी शेतकऱ्यांना अनेक कंपन्यांनी पुरुविल्यामुळे विदर्भात व मराठवाड्यात शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीमुळे नुकसान झाले असून यास कृषी खाते जबाबदार आहे . त्यामुळे शेतकरी मराठवाडा विदर्भात आत्महत्या करतोय ही सर्व जबाबदारी कृषी खात्याचे मंत्री व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे.कृषी खात्यात जलयुक्त शिवार, खते बी बियाणे औषधी परवाने, कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीच्या संदर्भात घोटाळा
केला असल्यामुळे सीबीआय,ईडी लोक
आयुक्त यांच्याकडे नावा सहित मुद्देनिहाय संपूर्ण चौकशीसाठी तक्रार दाखल केल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button