माजलगाव शेतकरी कामगार पक्षाच्या आसूड मोर्चा, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातला गोंधळ
🟧🟪🟥🟫🟣🔵🟠🟨🟥🟪🟧🛑🟤⬜🟫
माजलगाव(अजय सोनवणे)
.
जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे दुष्काळात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची पूर्ण पिके पावसाअभावी जळाली आहेत, जिल्हाभरात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येत प्रचंड वाढ झाली असून शेतकरी सह शेतकऱ्याचे पशुधन संकटात सापडले असल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे परंतु राज्यकर्त्यांना काही एक सोयर सुतक नसून मोठ्या अविर्भावात ते वावरत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चाचे आयोजन केले होते. या आसूड मोर्चाच्या प्रमुख मागण्या
दुष्काळ जाहीर करून,
हेक्टरी लाख रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा.
गतवर्षीच्या ऊसाचे तीन हजार रुपये प्रमाणे बिल द्या व चालू हंगामात 4000 भाव द्या, शेतीसाठी २४ तास उच्च दाबाने वीज पुरवठा करा.
गुरांना दावणीला चारा पाणी द्या. खाजीकरण रद्द करा. आदी मागण्यासाठी भाई मोहन गुंड, भाई ॲड नारायण गोले पाटील, भाई मुंजा पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आसूड मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून संभाळासह, हलगीच्या तालात व झांजा च्या आवाजात शाहीर युवराज ढगे यांच्या शाहिरी सुरात घोषणाबाजी करत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारंपारिक गोंधळ साजरा केला. मागण्या मान्य न झाल्यास बीड जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाहीत असा इशारा भाईॲड.नारायण गोले पाटील यांनी दिला.. यावेळी किसान सभेचे दिपकराव लिपणे, संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे, पांडुरंग गोंडे, रंजित जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन चे वशिष्ठ लांडगे, प्रहार संघटनेचे गोपाळ पैंजणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित नाटकर, शेतकरी संघटनेचे नीलाराम टोळे यांनी शेकापच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला तर शेतकरी कामगार पक्षाचे भाई अशोक बाप्पा रोडे , भाई महेश गायकवाड, मंगेश देशमुख ,भाई डिगांबर मगर , रामभाऊ, सुंदर सोनवर,भाई विष्णू शेळके, आनंत चव्हाण, राजेभाऊ शेरकर, राम पाटील चव्हाण, मारोतराव गावडे, दाशीराम शेरकर, श्रीराम शेवाळे, जनार्दन कुदळे, उलास घाटूळ, अभिमान जाधव, चंद्रकांत देशमुख, संभाजी चव्हाण, राजेभाऊ घोडके, नीलाराम टोळे, चंदुकाका बलवत, काळजी हांडे,बाजीराव ताकट, राहुल सोळंके, सुदाम चव्हाण रामराव चव्हाण, एकनाथ श्रीखंडे, वसंतराव श्रीखंडे, बालाजी रेडे, विकास शिवलिंगे, केशव खडूळ निवास खडूळ, आसाराम बापू, अशोक चव्हाण, प्रकाश खडूळ,सिद्धार्थ पोळ, विष्णू शेरकर,अनुरथ चव्हाण, तुकाराम नावडकर, बन्सी दादा वगरे, तुळशीराम वगरे शेषराव हांडे, सुभाष शेरकर, स्वामी हांडे, भास्कर कांबळे, परमेश्वर शिंगाडे, पवन वगरे, दगडोबा वगरे,यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी तालुक्यातून हजारो शेतकरी बांधव या आसूड मोर्चामध्ये सहभागी झाले होते.