पुणे मुंबई एक्सप्रेस वर कुरिअर घेऊन जाणाऱ्या गाडीला आग गाडी जळून खाक
पुणे (हरिदास पेंडोर)
– पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर काल (शनिवारी) पहाटे सव्वा तीन वाजता मुंबईवरून पुण्याला येताना (Pune) खंडाळा घाटात महिंद्रा पिकअप गाडीने पेट घेतला. यात गाडी जळून खाक झाली आहे. मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला. यात गाडी जळून खाक झाली आहे.
चालक कमलेश यादव आपल्या गाडीतून फ्रंटलाईन कुरियरचा माल मुंबई ते पुणे घेऊन जात असताना किलोमीटर 45 येथे आपली गाडी थांबवली. कारण बोनेटमधे शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. गाडीतील माल आगीच्या भक्षस्थानी पडण्यापूर्वी 21 बॉक्स बाहेर काढण्यात आले.
मात्र, दुर्दैवाने उर्वरित मालाचे बॉक्स व गाडी पूर्णपणे (Pune) जळून खाक झाली आहे. सुदैवाने चालक सुखरूप आहे. या अपघातात गाडीला लागलेली आग देवदूत टीम व फायर ब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली.
त्या दरम्यान काही काळ वाहतूक थांबवली होती. अपघात ग्रस्त गाडी बाजूला करून तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.