MAHARASHTRA

पुणे जिल्ह्यात आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन*



पुणे: (हरिदास पेंडोर)

🌕🌗आयुष्मान भव: अभियानांतगर्त पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये इत्यादी ठिकाणी तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

या आयुष्यमान भव: मेळाव्यात आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आयुष्मान आपल्या दारी ३.०, स्वच्छता अभियान,रक्तदान मोहीम, रक्त संकलन कार्यक्रम, अवयव दान जन जागृती मोहीम, आयुष्मान सभा, अंगणवाडी प्राथमिक शाळा मधील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची व १८ वर्षावरील सर्व पुरुषांची सवकर्ष आरोग्य तपासणी, सेवा सप्ताह, एन सी. डी कार्यक्रमाअंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी आजारावरील आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम राबविण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत सर्व आरोग्य संस्थेतील दर्शनी भागात साकारलेली विविध विषयांवरील आरोग्य विषयक माहिती लक्षवेधी ठरली. यावेळी सर्व आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढावे यासाठी प्रोत्साहन म्हणून मान्यवरांच्या हस्ते माता आणि बाळास बेबी किट, बाळाच्या जन्माचे दाखले, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आणि आभा कार्डचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

यावेळी ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘लेक वाचवा’ ‘लेक शिकवा’ व स्त्री भ्रूण हत्या इत्यादी सामाजिक विषयावर आरोग्य जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील एकूण ६२४ आरोग्य संस्थाअंतगर्त २८ हजार ८८४ नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button