*नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन*
पुणे( हरिदास पेंडोरे)
महिला व बाल विकास विभागातर्फे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह म्हणून ‘सखी निवास’ ही योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यात भाडे तत्वावरील इमारतीमध्ये सखी योजना राबविण्यासाटी इच्छुक संस्थांकडून ७ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आहे.
प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, केंद्र शासनाच्या मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेच्या मार्गदर्शक सूचना, प्रस्ताव सादर करावयाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पद्धत, संस्था, एजन्सीचे पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत, भौतिक सोयीसुविधा, अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इत्यादीची सविस्तर माहिती महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या https://www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक संस्था, एजन्सी यांनी त्यांचे प्रस्ताव महिला व बालविकास अधिकारी, गुलमर्ग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे या ठिकाणी ७ दिवसात सादर करावेत, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
0000