’गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी ‘आयुष्मान भव:’
पुणे (दत्तात्रय भोसले)
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी ‘आयुष्मान भव:’
ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा अंतर्गत विविध तपासण्या व उपचार, रक्तदान मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी व्यापक स्वरुपात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाअंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमधून हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत विविध उपक्रम विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहेत.
‘आयुष्मान आपल्या दारी ३. ०’
पात्र लाभार्थ्यांची आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण करणे हा मुख्य मोहिमेचा उद्देश आहे. आरोग्य संस्थांमधील कार्यरत ‘एएनएम’ व ‘एमपीडब्ल्यू’ आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कार्ड तयार करणे, स्वयंनोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, घरोघरी ई-केवायसी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. ही यादी आरोग्यवर्धीनी केंद्रावर तसेच गावातील महत्वाच्या ठिकाणीही लावण्यात येणार असून लाभार्थ्यांची नोंदणी पीएमजेवाय पोर्टलवर करण्यासह आयुष्मान कार्ड तयार करण्यात येणार आहे.
स्वच्छता अभियान:
२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व आरोग्य संस्थामध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालये, तसेच वैद्यकिय महाविद्यालये येथे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याकरिता लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, जनआरोग्य समिती सदस्य व रुग्णकल्याण समिती सदस्य यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संसर्ग नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अवगत करण्यात येणार असून त्या त्या स्तरावर विविध मोहिमेबाबत व आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे
आयुष्मान मेळावा:
आरोग्यवर्धनी केंद्रे, सर्व कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर्स स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांची तर दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर संसर्गजन्य आजार तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी दिलेल्या संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रक्तदान मोहीम:
जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांची ‘ई-रक्तकोष पोर्टल’ वर नोंदणी करणे, नियमित रक्तपेढी मार्फत पोर्टलवर रक्तासाठी मागणी व रक्तदान केलेल्यांची माहिती अद्ययावत करण्यास सांगण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. रक्तदात्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अवयवदान जागृती मोहीम:
अवयवदानाद्वारे एक व्यक्ती ८ जनांना जीवनदान देऊ शकते. सर्व आरोग्य संस्था, ग्रामसभा, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालये आदी स्तरावर https://notto.abdm.gov.in/pledge-registry या वेबलिंकवर उपलब्ध असलेली अवयवदान प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. तसेच सर्वांना अवयवदानासाठी आवाहन करण्यात येणार असून ज्यांची अवयवदान करण्याची इच्छा आहे त्यांची वेबलिंकवर नोंदणी करण्यात येणार आहे. अवयवदानासंबंधी अधिक माहिती टोल फ्री क्र. १८००-११४७-७० वर संपर्क साधल्यास उपलब्ध होऊ शकते. https://www.notto.mohfw.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
आयुष्मान सभा:
सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, योगाचार्य जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती प्रतिनिधी, बचतगट, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. सभेचा मुख्य उद्देश हा आयुष्मान कार्डचे वितरण करणे व जनतेला या बाबत अवगत करणे हा आहे.
अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी (वयोगट ० ते १८ वर्ष):
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र व प्राथमिक शाळांमधील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत तसेच या वयोगटातील मुलांचे ४ डी तपासणी करण्यात येणार आहे. ३२ सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करून जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रियेकरिता संदर्भित केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्रे, व्हिलचेअर आदी सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. याबाबत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठीचा कालावधी हा १ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ असा नियोजित करण्यात आलेला आहे.
– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे*गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी ‘आयुष्मान भव:’* ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा अंतर्गत विविध तपासण्या व उपचार, रक्तदान मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी व्यापक स्वरुपात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाअंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमधून हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत विविध उपक्रम विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहेत. *‘आयुष्मान आपल्या दारी ३. ०’* पात्र लाभार्थ्यांची आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण करणे हा मुख्य मोहिमेचा उद्देश आहे. आरोग्य संस्थांमधील कार्यरत ‘एएनएम’ व ‘एमपीडब्ल्यू’ आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कार्ड तयार करणे, स्वयंनोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, घरोघरी ई-केवायसी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. ही यादी आरोग्यवर्धीनी केंद्रावर तसेच गावातील महत्वाच्या ठिकाणीही लावण्यात येणार असून लाभार्थ्यांची नोंदणी पीएमजेवाय पोर्टलवर करण्यासह आयुष्मान कार्ड तयार करण्यात येणार आहे. *स्वच्छता अभियान:* २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व आरोग्य संस्थामध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालये, तसेच वैद्यकिय महाविद्यालये येथे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याकरिता लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, जनआरोग्य समिती सदस्य व रुग्णकल्याण समिती सदस्य यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संसर्ग नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अवगत करण्यात येणार असून त्या त्या स्तरावर विविध मोहिमेबाबत व आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे *आयुष्मान मेळावा:* आरोग्यवर्धनी केंद्रे, सर्व कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर्स स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांची तर दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर संसर्गजन्य आजार तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी दिलेल्या संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येणार आहेत. *रक्तदान मोहीम:* जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांची ‘ई-रक्तकोष पोर्टल’ वर नोंदणी करणे, नियमित रक्तपेढी मार्फत पोर्टलवर रक्तासाठी मागणी व रक्तदान केलेल्यांची माहिती अद्ययावत करण्यास सांगण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. रक्तदात्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. *अवयवदान जागृती मोहीम:* अवयवदानाद्वारे एक व्यक्ती ८ जनांना जीवनदान देऊ शकते. सर्व आरोग्य संस्था, ग्रामसभा, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालये आदी स्तरावर https://notto.abdm.gov.in/pledge-registry या वेबलिंकवर उपलब्ध असलेली अवयवदान प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. तसेच सर्वांना अवयवदानासाठी आवाहन करण्यात येणार असून ज्यांची अवयवदान करण्याची इच्छा आहे त्यांची वेबलिंकवर नोंदणी करण्यात येणार आहे. अवयवदानासंबंधी अधिक माहिती टोल फ्री क्र. १८००-११४७-७० वर संपर्क साधल्यास उपलब्ध होऊ शकते. https://www.notto.mohfw.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. *आयुष्मान सभा:* सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, योगाचार्य जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती प्रतिनिधी, बचतगट, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. सभेचा मुख्य उद्देश हा आयुष्मान कार्डचे वितरण करणे व जनतेला या बाबत अवगत करणे हा आहे. *अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी (वयोगट ० ते १८ वर्ष):* या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र व प्राथमिक शाळांमधील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत तसेच या वयोगटातील मुलांचे ४ डी तपासणी करण्यात येणार आहे. ३२ सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करून जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रियेकरिता संदर्भित केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्रे, व्हिलचेअर आदी सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. याबाबत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठीचा कालावधी हा १ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ असा नियोजित करण्यात आलेला आहे. *
– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे*