ऐनवेळी गेली वीज; मंत्री अतुल सावे ध्वजाराेहणासाठी २५ मिनिटे वेटिंगवर:परभणीत नियोजनाचा ढिसाळपणा, मनपा- वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव, नांदेडमधील कार्यक्रमाचाही उडाला फज्जा*
🗞*MAHESH DARSHAN*
*ऐनवेळी गेली वीज; मंत्री अतुल सावे ध्वजाराेहणासाठी २५ मिनिटे वेटिंगवर:परभणीत नियोजनाचा ढिसाळपणा, मनपा- वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव, नांदेडमधील कार्यक्रमाचाही उडाला फज्जा*
*18 September, 2023,
महेश कुलकर्णी
————+-+——
मुंबई —–मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अायाेजितकार्यक्रमात नियोजनाचा ढिसाळपणा अनुभवण्यासमिळाला. सकाळी १२० फूट उंच व ४० मीटर लांबराष्ट्रध्वज गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे फडकवायला जाणार होते. राष्ट्रध्वजस्तंभाचे अनावरण करण्यासाठी सकाळी ९.३० वाजतामंत्री सावे बटण दाबणार तोच विद्युत पुरवठा खंडितझाला. या वेळी एकही वीज वितरण विभागाचाअधिकारी उपस्थित नव्हता. २५ मिनिटांच्या नंतर वीजआल्यावर ध्वज फडकावला गेला. या गोंधळामुळे मंत्रीसावे प्रचंड संतापले व त्यांनी महावितरणच्याअधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. नांदेडमध्येही ढिसाळनियोजन पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राजगोपालाचारीउद्यानातील हुतात्मा स्मारक येथे पुष्पांजली, पुष्पचक्रअर्पण व मुख्य शासकीय राष्ट्रध्वज ध्वजारोहण कार्यक्रमपार पडला. याच दरम्यान उद्यानात मनपा प्रशासनाकडूनउभारण्यात आलेल्या १२० फूट उंच व ४० मीटर उंचीच्याराष्ट्रध्वजस्तंभाचे अनावरण मंत्री अतुल सावे यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी खा. संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारीरघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रागसुधा आर. ववरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठीक ९.३० वाजण्याच्यासुमारास मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले, परंतु ऐनवेळी वीज गेल्याने एकच गोंधळ उडाला. २५ मिनिटांनंतर ध्वजारोहण झाले.
…तर निलंबित केले असते
सावे यांनी महावितरणचे अधीक्षकअभियंता आर. बी. माने व परभणीशहराचे उपकार्यकारी अभियंताशिवणकर यांना चांगलेच झापले. तेम्हणाले की, तुम्ही मराठवाड्यात राहतनाहीत का?, राष्ट्रध्वज अर्ध्यात चढलाअसता तर तुम्हाला जागेवर निलंबितकरायला मागेपुढे पाहिले नसते. ऊर्जामंत्र्यांना बोलून तुमच्यावर कारवाई करायला सांगतो.
भाषण एेकणे झाले अशक्य
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.नागरिकांना आसन व्यवस्थापालकमंत्र्यांच्या पाठीमागे होती. त्यातचमंडपाची उभारणी करण्यात आलीनव्हती. त्यामुळे उन्हाचे चटके बसतहोते. ध्वनिक्षेपक यंत्रणेचे नियोजनइतके सुमार होते की, कोणत्याहीनागरिकांना त्यांचे भाषण ऐकता आलेनाही. अनेकांनी काढता पाय घेतला.
ऐनवेळी गेली लाइट
राष्ट्रध्वज वर चढवण्यासाठीअसलेल्या मोटरीसाठी थ्री फेजविद्युत पुरवठा आवश्यक आहे. त्यादृष्टीने पूर्ण व्यवस्था केली होती, परंतुऐनवेळी वीज गेली. यामुळे विद्युतपुरवठा येईपर्यंत थांबावे लागले.जनरेटरवर मोटार चालवणे शक्यनसल्याने जनरेटरची व्यवस्था केलीनव्हती.
– वसीम पठाण, शहरअभियंता, मनपा परभणी.
मानवंदनेनंतर आवाज
दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजनहे ध्वजवंदन करून स्वातंत्र्यसैनिकआणि अभ्यागतांना भेटून परतले.तेवढ्यात बंदुकीचा आवाज झाला.मानवंदना झाल्यानंतर कदाचित एकगोळी चुकून राहिली असावी, अशीचर्चा सुरू होती. मात्र कुणालाही इजाझाली नाही. हा प्रकार केवळ आवाजहोता. कोणतीही गोळी उडाली नाही,असे पोलिस अधीक्षक श्रीकृष्णकोकाटे यांनी कळवले आहे.
*_