महाराष्ट्रामधील आपत्कालीन त्रिमूर्ती सरकार कृषी खात्यामध्ये बी बियाणे खते कीटकनाशक औषधी बोगस सापडल्यामुळे नवीन कायदा करण्यासंदर्भात तक्रारीची माहिती मागितली आहे . परंतु आज तागायत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी तालुका जिल्हा विभाग स्तरापासून मंत्रालय वेगवेगळ्या न्यायालयात व पंतप्रधान कार्यालयापर्यंत पर्यंत तक्रारी पुराव्या सहित अर्जासोबत दाखल केलेलीची त्रिमूर्ती सरकार दक्कल धेणार का? असा गंभीर आरोप महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . महाराष्ट्र मध्ये सन २०१६ पासून आज तागायत गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक राज्यातून भेसळ युक्त बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधी भेसळ करणाऱ्यांचे खूप मोठे टोळके तयार झालेले असून विक्रेत्यामार्फत कमी भावाने माल पुरवणे व त्याची पावती बिले न देणे,बोगस कच्चा माल पुरवठा पॅकिंग करणारे पिशव्या छापणारे ग्राहक शोधणारे शेतकऱ्यापर्यंत माल पुरविणारे खूप मोठे रॉकेट तयार झाले आहे. त्यावर कृषी खात्याचे स्थानिक गुणनियंत्रण अधिकारी जिल्हास्तरीय विभाग स्तरीय राज्यस्तरीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे व कृषी मंत्री , कृषी मंत्रालयातील जबाबदार अधिकारी यांची बघ्याची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारे टोळके शासनाच्या आशीर्वादाने बळीराजाचा घात करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. केंद्र सरकारचे तीन नवीन कृषी कायदे तयार केले व शेतकऱ्यांच्या कायद्याला विरोध असतानाही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला अखेर सरकारला तीन ही कायदे मागे घ्यावे लागले. शासनाच्या प्रयोगशाळेत खते बि बियांनी कीटकनाशक औषधे तपासणी मध्ये बोगस अप्रमानीत (नापास) निघाले तरी ही कंपनीविरुद्ध व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध एफ आय आर दाखल केले जात नाहीत. शासनाला माहित आहे शेतकरी हा संघटित नाही. त्याचा राजकीय पक्ष नाही मतदान करीत असताना जातीच्या उमेदवाराला मतदान करतो. खोटे आश्वासने मुळे अक्षरशः. शेतकरी राज्या आर्थिक दृष्ट्या हातबल झालेला आहे.केंद्र व राज्य सरकारने खते बी बियाणे औषधी कीटकनाशके तणनाशके अवजारे यांच्यावर जीएसटीचे कर लावून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट शेतकऱ्यांची केली जात असून शेतकऱ्याकडे शेतीमाल तयार झाल्यावर बाहेरील देशाकडून शेतीमालाच्या आयातीचे निर्णय केंद्र सरकार ने घेऊन देशातून शेतकऱ्याचा माल बाजारपेठेतील मंदीमुळे संपूर्णपणे भाव पाडण्याचे मोठे षडयंत्र सरकारचे असून शेतकरी सर्व दृष्टीने बेचेन आहे. कारण त्याच्या हातात स्वतःच्या तयार केल्या मालाचे भाव ठरवण्याचा अधिकार नाही ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . शेतकरी पेरणी करीत असताना पाऊस कधी ही वेळेवर पडत नाही त्यामुळे पेरणीला उशीर होतो पाऊस न पडल्यामुळे पिके करपून जातात वाढ खुंटली जाते पिकावरील रोगराईमुळे दैनंदिन रोजगारामुळे शेतकरी हा सारखा दडपणाखाली असतो कारण संपूर्ण जीवन त्याचे शेतीवर अवलंबून असते शेतीवर लावलेले खर्च पिक पदरात पडेपर्यंत अवघड असते कारण अतिवृष्टीचे संकट ,कधी निसर्गाचे रोगराई संकट, बाजारपेठेतील मालाच्या भावाचे चढउतारीचे संकट , बोगस खत बी बियाणे कीटकनाशक संकट, आर्थिक कौटुंबिक मोठे संकट, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याचे वरील कारणे आहेत त्यावर शासन कडून नियमाप्रमाणे आर्थिक मदत , पिक विमा, नुकसान भरपाई, बाजारपेठे मधील शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाचा दर नाही. शेतकऱ्यांनी वेगवेगळे तक्रार अर्ज देऊनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी हा सर्वदृष्टीने शासनावर वर नाराज आसुन विविध कंपन्यांची सदोष बी बियाणे खते औषधी संदर्भात शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ची आर्थिक मदत करण्याची कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे . तरी तात्काळ कायदा दुरुस्त करून नवीन कायदा करताना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याबाबतीत ” “खास बाब ” म्हणून तरतूद करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली .